लहान मुले मान कधी धरते?
तीन ते चार महिन्यात बाळाच्या मानेचे स्नायू लक्षणीयरित्या सुधारलेले असतात. यावेळी बाळाला पोटावर झोपवल्यावर ते आपले डोके हळूहळू वर उचलून स्थिर ठेऊ शकते. पाच ते सहा महिने वयापर्यंत, मानेच्या मांसपेशी मजबूत झालेल्या असतात त्यामुळे ते डोक्याचा भार सहज पेलू शकतात.