लेबर पेन म्हणजे काय?

Language: Marathi | Published: 12 Oct 2022 | Views: 3
लेबर पेन म्हणजे काय?
लेबर हा एकच उच्चार; परंतु दोन स्पेलिंग असणारा शब्द आहे. एकाचा अर्थ होतो कठीण श्रम आणि दुसऱ्याचा अर्थ होतो बाळाचा जन्म. अर्थात, स्पेलिंग वेगळे असले, तरी उच्चार आणि अर्थ सारखेच. कठीण श्रम किंवा बाळाचा जन्म, म्हणजेच प्रसूतीसाठी हा शब्द जगभरात बोलीभाषेत आणि वैद्यकीय भाषेतही वापरला जातो. श्रम हा याचा मूळ अर्थ आहे. कामगार, वर्कर, लेबर म्हटले, की दिवसभर घाम गाळत पोटापाण्यासाठी काम करत राहणारी व्यक्ती आपल्या नजरेसमोर येते. या शब्दाला एक अंगभूत अनुकंपा आणि सहवेदना असते. त्यातूनच मग कामगार कल्याण, संघटना, हक्क आणि कायदे इत्यादी गोष्टी निर्माण होतात.कोणत्याही प्रकारची व्हजायनल डिलिव्हरी, ज्यात बाळ डोक्याकडून नसेल (पायाळू किंवा आडवे बाळ) किंवा डोक्याकडून असेल; पण काही कॉम्प्लिकेशन्स झाले असतील किंवा काही शस्त्रक्रिया करून खालून बाळ बाहेर काढावे लागत असेल
Share this article:

Facebook | Twitter | WhatsApp