वेखंड बाळासाठी?pregnancytips.in

Posted on Sat 6th Oct 2018 : 14:09

हे घरगुती उपचार करतील बाळाची सर्दी चुटकीसरशी दूर

लहान बाळाला सर्दी-खोकला होणं खूपच सामान्य गोष्ट आहे. लहान मुलांना लगेचच जास्त पॉवरची औषधे देणे योग्य नसते. त्यामुळे घरगुती उपचार त्याला आराम पडण्यास लाभदायक ठरु शकतात. जर डॉक्टरची भेट घेऊ शकतो अशावेळी बाळ आजारी पडलं तर नक्कीच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. पण रात्री-अपरात्री अचानकच बाळाचा त्रास वाढला तर हे उपाय तुमची मदत करु शकतात.

लहान बाळाला सर्दी होणे हि एक सामान्य समस्या आहे, पण ही समस्या बाळाला कधी कधी खूप त्रस्त करू शकते आणि साहजिकच त्याचा हा त्रास आपल्याला बघवत नाही, कधी कधी पहिली सर्दी, मग ताप आणि मग खोकला सुद्धा सुरु होतो आणि भयंकर आजाराचे रूप घेतो. यासाठीच बाळाला सर्दी झाल्यास योग्य ते उपचार करून लवकर सर्दी नियंत्रणात आणणे महत्त्वाचे ठरते. आपण अशावेळी बाळाला वैद्यकीय औषधे तर देऊ शकत नाही. पण काही घरगुती उपचार नक्की करू शकतो. या उपचारांनी बाळाला अजिबात धोके नसतात. चला तर या विशेष लेखातून आपण याच घरगुती उपचारांबद्दल जाणून घेऊया. जेणेकरून आपत्कालीन स्थितीत तुम्ही हे उपचार करून बाळाला आराम मिळवून देऊ शकता.

बाळाला वाफ घेतल्याने होणारे फायदे

सर्दी झाली की नाक खूप बेजार करते. आपल्या मोठ्या लोकांना इतका त्रास होतो तर त्या लहान जीवाला सुद्धा किती त्रास होत असेल, अशावेळी श्वसन नलिकेतील म्युकस मोकळे करण्यासाठी वाफ देणे हा सर्वाधिक रामबाण उपाय ठरतो. बाळाच्या खोलीत फेशियल स्टीमर किंवा वेपोराइजरच्या मदतीने वाफ पसरवा. ६ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळासाठी बाथरूम मध्ये गरम पाणी नळातून वाहू द्या आणि बाळाला बाथरूम मध्ये १० ते १५ मिनिटे घेऊन बसा. बाळ १ वर्षापेक्षा मोठे असेल तर गरम पाण्यात यूकेलिप्‍टस ऑयलचे काही थेंब टाकून त्याचा वापर करता येतो.


खारट पाण्याच्या गुळण्या

जर बाळ दोन वर्षापेक्षा जास्त वयाचे असेल तर पाण्याच्या गुळण्याचा उपाय अवश्य वापरून पहावा. यासाठी एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकावे आणि बाळाला त्या पाण्याच्या गुळण्या करायला सांगाव्यात. पण यासाठी तुम्ही मुलाला गुळण्या करायला आधी शिकवले असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही त्याला करून दाखवा अथवा पहिले त्याला साध्या पाण्याने गुळण्या करायला सांगा. हा उपाय अतिशय रामबाण आणि सोप्पा असल्याने तुम्ही कधीही करू शकता.


कोमट पाणी

६ महिने वयाच्या बाळाला उकळलेले पाणी पाजावे. पण हे पाणी जास्त गरम असू नये तर कोमटच असावे अन्यथा बाळाचे तोंड भाजू शकते. सर्दी झाल्यास बाळाला सतत हे पाणी पाजत राहावे यामुळे शरीर हाइड्रेट राहते. हे पाणी जेव्हा शरीराबाहेर टाकले जाते तेव्हा त्यासोबत विषारी तत्वे सुद्धा बाहेर पडतात. ६ महिन्यांपेक्षा लहान बाळाला सर्दी पासून आराम देणारा हा अतिशय गुणकारी उपाय आहे.


मोहरीचे तेल

एक वर्षे वयाच्या बाळासाठी सर्दीवर उपाय म्हणून मोहरीचे तेल सुद्धा वापरले जाऊ शकते. एक चमचा मोहरीचे तेल घ्या आणि त्यात एक लसूण पाकळी आणि लवंग टाकून शक्य असल्यास एक चिमुटभर आजवाईन पावडर मिसळा. या सर्व गोष्टींचे मिश्रण एक मिनिटे पर्यंत गरम करून घ्या. लसूण पूर्णपणे करपू देऊ नका. आता गाळणी घेऊन हे मिश्रण गाळून घ्या. हे मिश्रण कोमट झाले की बाळाची छाती आणि पाठीवर मालिश करावी.


मध

मधामध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट गुणधर्म रात्रीचा होणारा खोकला, गळ्यातील इन्फेक्शन किंवा खोकला आणि सर्दी तसेच यामुळे वारंवार होणारी झोपमोड यावर रामबाण ठरतात. एक वर्षे वयापेक्षा कमी बाळाला मात्र मध देऊ नये. बाळाचे वय एक वर्षापेक्षा जास्त असेल तर रात्री त्याला झोपण्याआधी एक चमचा मध चाटायला द्यावे. तर मंडळी हे आहेत काही साधे सोपे उपाय जे तुमच्या बाळाला सर्दीपासून आराम मिळवून देऊ शकतात. हि माहिती आपल्या मित्रमंडळीपर्यंत पोहचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अमुल्य माहिती मिळून त्याच्या घरातील बाळाला अचानक सर्दी झाल्यास ते यापैकी एक घरगुती उपचार वापरू शकतात. जर हे उपचार वापरून सुद्धा फरक पडला नाही तर मात्र जास्त वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधावा.

solved 5
wordpress 5 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info