शुक्राणूंची ताकत आणि संख्या वाढविण्यासाठी काही उपाय सांगा?pregnancytips.in

Posted on Fri 28th Oct 2022 : 08:25

Sperm ची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी घरगुती उपाय
शुक्राणूंची (sperm) संख्या वाढवण्यासाठी बरेच घरगुती उपचार देखील आहेत, ज्याचे काही दुष्परिणामही उद्भवत नाहीत.

निरोगी जीवनासाठी आणि संतती प्राप्तीसाठी शारीरिक संबंध महत्वाचे आहेत. अनेक दाम्पत्याला मूल होत नाही. याचं कारण म्हणजे महिला किंवा पुरुषांमध्ये असलेली समस्या. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असेल किंवा त्यांची गुणवत्ता चांगली नसेल तर मूल होण्यात अडचण निर्माण होऊ शकते.

myupchar.com शी संबंधित डॉ. राजलक्ष्मी यांनी सांगितलं, पुरुषांच्या वीर्यात शुक्राणूंची कमतरता याला वैद्यकीय भाषेत ओलिगोस्पर्मिया असं म्हणतात. शरीरात शुक्राणू पूर्णपणे संपल्यावरही अशी परिस्थिती निर्माण होते. याला एडुस्पर्मिया म्हणतात. पुरुषांमधील एका मिलीलीटर पांढऱ्या द्रवात 1.5 कोटी शुक्राणूंचा समावेश असणं आवश्यक आहे. जर यापेक्षा कमी असेल तर उपचार करणं गरजेचं आहे.

शुक्राणू कमी होण्याची लक्षणे

पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या कमतरतेची काही लक्षणं दिसून येतात. पुरुषांच्या जननेंद्रियात सूज, गाठ, चेहऱ्यावरील केस गळणं, संप्रेरकांची असामान्य स्थिती. डॉ. व्हीके राजलक्ष्मी यांच्या मते, जर एखाद्या पुरुषाला वर्षभर तरी शारीरिक संबंधांची कधी इच्छाच झाली नसेल त्यामुळे संबंध ठेवले नसतील तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. तसंच जर एक वर्ष शारीरिक संबंधांनंतरही गर्भधारणा होत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करायला हवा.

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी बरेच घरगुती उपचार देखील आहेत, ज्याचे काही दुष्परिणामही उद्भवत नाहीत.

शुक्राणू वाढवण्याचे घरगुती उपाय

अश्वगंधा

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, अश्वगंधा शुक्राणू वाढवण्याची उत्तम आहे. एक ग्लास दुधात अर्धा चमचा अश्वगंधा मिसळा आणि त्याचं नियमित सेवन करा. सुरुवातीला तुम्ही याचं दिवसातून दोनदा सेवन करू शकता. याशिवाय अश्वगंधाच्या मुळाच्या रसही पिऊ शकता.

लसूण

लसूण देखील शुक्राणूंची संख्या वाढवण्याचा एक घरगुती जिन्नस आहे. नैसर्गिकरित्या शारीरिक संबंधांची इच्छा वाढवण्याचं हे एक औषध आहे. यात अ‍ॅलिसिन नावाचं एक कंपाउंड असतं जे शुक्राणू वाढवतं. याव्यतिरिक्त लसणामधील सेलेनियम शुक्राणूंची चपळता सुधारण्यास मदत करतं.

इतर उपाय

या व्यतिरिक्त, पॅनाक्स जिन्सेंग हे एक शुक्राणू वाढवणारं औषध आहे. याला कोरियन जिन्सेंग देखील म्हणतात. चीनमध्ये याचा उपयोग तणाव कमी करण्यासाठी केला जातो. शुक्राणू वाढवण्यासाठी ग्रीन टीदेखील पिऊ शकता. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे शुक्राणू खराब होण्यापासून रोखतात आणि शुक्राणूंची गुणवत्ता, वेग वाढतो.

याशिवाय आहारात जीवनसत्त्व, जस्त, सेलेनियम, फॉलिक अॅसिड आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिडस् युक्त पदार्थांचा समावेश करा.

ताण घेऊ नका, पुरेशी झोप घ्या.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - लैंगिक आरोग्य

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info