सहा महिन्याच्या बाळाला काय द्यावे खायला?pregnancytips.in

Posted on Tue 11th Oct 2022 : 14:22

घरात तान्हुले बाळ आले की, घराचे वातावरण एकदम बदलून जाते. बाळासाठी वेगवेगळ्या गोष्टी तयार करण्याची लगबग सुरु होते. नवमातांना तयारी करावी लागते. आपल्या बाळाला एकदम परफेक्ट आहार मिळावा यासाठी खिमटी किंवा बाळाचे वेगवेगळे पदार्थ घरी केले जातात. वेगवेगळ्या डाळी भाजूनही ठेवली जाते.जी शिजवून बाळाला प्रोटीन मिळवून देण्याचे काम करते. फळांचा गर, रस अशा या सगळ्या गोष्टी भरवण्याची एक वेळ असते. म्हणजे जन्मलेल्या बाळाला लगेचच सगळ्या गोष्टी खाता येत नाही. तो त्यांचा आहार देखील नसतो. साधारण 4 महिन्यांपासून दात येऊ लागले की, बाळाच्या आहारात थोडे बदल करणे गरजेचे असते. या एवढ्या वयात तान्ह्या बाळांच्या आहारात बदल करायला हवा. तसंच बाळ 7 महिन्यांचे झाल्यानंतर आहार नेमका कसा द्यायचा ते देखील जाणून घ्या.
6 महिन्यांच्या बाळाचा आहार

6 महिन्यांच्या बाळाचा आहार हा त्यांच्या वाढीसोबत वाढू लागतो. त्यांना दात आल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी खाता येतात. साधाऱण या महिन्यांपर्यंत बाळांना आहारात वेगवेगळ्या चवी असाव्यात असे वाटू लागते. त्यामुळे तुम्ही आहारात काही गोष्टी अगदी बिनधास्त समाविष्ट करु शकता.
भाताची पेज

भाताची पेज ही कधीही आणि कोणत्याही वयासाठी चांगली असते. लहान बाळांना मऊ भाताची पेज तर फारच आवडते. यामध्ये मीठ असल्यामुळे आणि तांदुळाची चव असल्यामुळे ही भाताची पेज पोटभरीची आणि अधिक चविष्ट लागते. भाताची पेज करण्यासाठी खास उकडे तांदूळ मिळतात. ते स्वच्छ धुवून पाणी आणि मीठ घालून चांगल्या मऊ होईपर्यंत त्याच्या शिट्ट्या काढा. भात छान मऊ झाल्यानंतर तुम्ही ती भाताची पेज त्यांना बाळांना द्या. त्यामध्ये पाणी जास्त असेल तर ते मीठाचे पाणी बाळांना फार आवडते. त्यासोबत भातही खाल्ला जातो.
खिमटी

मिश्र डाळींची खिमटी हा प्रकार खूप जण लहान बाळांसाठी घरीच करतात. वेगवेगळ्या डाळी भाजून त्याची पावडर केली जाते. ही खिमटी शिजवून त्यावर तूप घालावे. खिमटी ही बाळाला आवडेल त्यानुसार पातळ किंवा थोडीशी घट्टसर करावी. त्यामुळे त्यांना खाणे बरे पडते. लहान बाळांना खिमटी हा पुरक असा आहार आहे. तो त्यांना चांगलाच आवडतो. यामध्ये मूग डाळ,मसूर डाळ, तूरडाळ, ड्रायफ्रुट्स यांचा समावेश असतो. त्यामुळे हे खाणे अधिकच पौष्टिक असते. 6 महिन्याच्या बाळाचा आहार हा असा असावा.
पातळ खिचडी

खिचडी ही भात आणि डाळीपासून बनवलेली अत्यंत पौष्टिक अशी डिश आहे. यामुळे बाळाचे पोट छान भरते. बाळासाठी खिचडी करताना त्यामध्ये फार काही घालता येत नाही.तांदूळ आणि डाळ भिजत घाला.तांदूळाच्या तुलनेत डाळ जास्त असलेली बरी. त्यामुळे बाळाला जास्तीत जास्त डाळ जाते. रोजच्या प्रमाणे कुकरला खिचडी लावून ती जास्तीत जास्त शिजवा. या खिचडीत तुम्ही बटाटा किंवा काही भाज्या घातल्या तरी चालू शकेल.
किसलेले किंवा बारीक केलेली फळ

किसले

ली आणि बारीक केलेली फळ ही देखील सहा महिने पूर्ण झालेल्या बाळांना चालू शकतात. पण ही फळ नरम असायला हवी. या वयात मुलांना दात असले तरी देखील त्यांना खात येत नाही. त्यामुळे केळी, आंबा किंवा कलिंगड, सफरचंद, पेर अशी फळे थोडी किसून दिली तरी चालू शकतात.
मासे

जर तुम्ही मासांहार खाणारे असाल तर बाळांना मासे फ्राय देण्यासही हरकत नाही. पापलेट किंवा काटे नसलेले मासे फक्त मीठ,हळद आणि तिखट घालून तुम्ही मासे फ्राय करा. हा मासा अगदी थोडासा त्यांच्या खिचडीमध्ये घालून त्यांना द्या. लहान बाळ फ्राय मासा पूर्ण खाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना आधी एखादा तुकडा देण्यापासूनच सुरुवात करा.
उकडलेले अंड

माशांव्यतिरिक्त तुम्ही उकडलेले अंड देखील बाळांना देऊ शकता. अंड चांगले उकडून त्याला मोडून अंड्याचा पिवळा बलक आणि पांढरा बलक असे दोन्ही द्या. त्यांच्या खिचडीमध्ये उकडलेले अंडे त्यांना दिले तर चालू शकेल. जर बाळाला याची चव आवडली नसेल तर त्यांना जबरदस्ती खायला देऊ नका. कारण त्यांना जर नावडती गोष्ट दिली तर ते पुन्हा ते खाणार नाही. तसंच बाळ्याला देण्याचे अंड्याचं प्रमाणही डॉक्टरांना विचारून मगच द्या.
उकडलेली रताळी

पोटभरीसाठी आणि चवीसाठी मस्त असा आहार म्हणजे रताळी. बाळांना पिष्टमय पदार्थ अधिक आवडतात. जर त्यांना तुम्ही रताळी थोडीशी उकडून दिली तरी देखील चालू शकते. रताळी उकडल्यानंतर ती तुम्ही खाऊन बघा. जर ती घशात लागत नसतील तरच ती बाळांना द्या. कारण अनेकदा रताळीमुळे घास लागण्याची शक्यता असते. त्यामुळे रताळी आधी तुम्ही चाखून बघा.
शिजलेल्या भाज्या

भाज्या या कधीही बाळांना देणे चांगलेच. पण बाळांना भाज्या देताना त्यांना फ्लॉवर, ब्रोकोली अशा स्मॅश होतील अशाच भाज्या देता येतात. त्यांना भाज्या देण्यास काहीच हरकत नाही. पण या भाज्या त्यांच्या पातळ खिचडीमध्ये घाला म्हणजे त्यांना ते खाता येतील.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info