सातव्या महिन्यात बाळ कसे दिसते?pregnancytips.in

Posted on Thu 10th Nov 2022 : 09:56

प्रसूतीवेदनेसाठी योजना तयार करा
आता तुमचे बाळ गर्भाशयातही डोळे उघडू शकते व प्रकाशाच्या दिशेने डोळे वळवू शकते! आता ते ऐकू शकते व मोठा आवाज ऐकल्यानंतर लाथ व उडी मारु शकते, व तुम्ही त्याच्याशी बोलता किंवा गाणे म्हणता तेव्हा शांत होऊ शकते.

आता लवकरच गर्भाशयात त्याचे डोके खालच्या दिशेला होईल. आधी डोके बाहेर येईल, म्हणूनच डोके खालच्या दिशेला येते, व प्रसूतीवेदना सुरू होण्यासाठी तयार होते.

तुमचे पोट आणखी मोठे झाल्याने अस्वस्थ वाटू शकते व व्यवस्थित झोपता येत नाही. एका कुशीवर झोपा व पायात उशी ठेवा म्हणजे पोटाला आधार मिळेल. तुम्हाला नितंबांच्या भागात थोडी वेदना जाणवू शकते कारण तुमचे नितंब कटीभागाला जोडणाऱ्या ताणल्या जाणाऱ्या उती सैल होऊ शकतात. तुमचे शरीर प्रसूतीवेदनेसाठी तयार होत आहे. तुम्ही हात आणि गुडघ्यांवर पुढे वाकल्यास मदत होऊ शकते.

प्रसूतीवेदनेच्या वेळी तुम्हाला सुईण किंवा डॉक्टरांकडे जाण्यासाठी एक योजना तयार करावी लागेल. तुम्हाला तिथपर्यंत कसा प्रवास करायचा आहे ते ठरवा, यासाठी तुम्ही एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकांना ते मदत करतील का विचारा. तुमच्या कुटुंबाशी बोलून ठेवा व तुम्हाला कुठे घेऊन जायचे आहे हे त्यांना माहिती असेल याची खात्री करा.

गरोदरपणाच्या नंतरच्या काळात दवाखान्यात जा म्हणजे परिचारिका किंवा आरोग्य सेविका तुमची व बाळाची तब्येत व्यवस्थित असल्याची खात्री करु शकतील. त्या तुम्हाला प्रसूतीसाठी काय लागेल व प्रसूतीवेदना सुरु झाल्यावर दवाखान्यात कधी जायचे हे सांगू शकतील.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info