सिजर झाल्यावर किती दिवसांनी संबंध ठेवावे?pregnancytips.in

Posted on Sat 11th Apr 2020 : 19:28

प्रसूती नंतर शारीरिक संबंध कधी अन किती दिवसांनी ठेवावेत? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…
- आनंदी आयुष्यासाठी सेक्स हा एक महत्त्वाचा भाग असतो. सुखद आणि प्रसन्न सेक्ससाठी ऊर्जा देखील गरजेची असते. परंतु हे सर्व करत असताना अनेक गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे असते. विशेषतः महिलेची प्रसूती झाल्यानंतर ठेवायचे शारीरिक संबंध. यावेळी काळजी घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे प्रसूतीनंतर संभोग करण्याआधी किमान चार आठवडे वाट पाहणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सिझेरिअन प्रसूतीनंतर किंवा अन्य शस्त्रक्रियेमुळे टाके पडले असतील तर हा कालावधी सहा महिन्यांपर्यंत वाढू शकतो. ब्रिटनमध्ये महिला अधिकारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. एव्हिड डिहार यांच्या मते,
“मुलांमध्ये कमी अंतर राखल्यास स्तनदा मातांच्या दृष्टीने ते धोकादायक असतं. महिला सतत गरोदर राहिल्यास त्यांच्यात अॅनेमियाची समस्या दिसू शकते. त्यांचं शरीर कमजोर बनतं. गर्भधारणा आणि बाळंतपण यादरम्यान आईचं शरीर आपली संपूर्ण ऊर्जा यासाठी खर्ची घालतं. त्यामुळे महिलांना अशक्तपणा येतो.
” एव्हिड पुढे सांगतात, “बाळंतपणानंतर महिलेचं शरीर पूर्वीप्रमाणे होण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागतो. ऑपरेशनने बाळंतपण झाल्यास यासाठी जास्त कालावधीही लागण्याची शक्यता असते.

” प्रसूतीनंतर इस्ट्रोजेन पातळीमध्ये घट झाल्यामुळे योनीमार्गाचे नैसर्गिक वंगण कमी होते आणि जोपर्यंत तुम्ही बाळाला स्तनपान करीत आहात तोपर्यंत योनीमार्गाचा कोरडेपणा तसाच राहतो.

शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा अशी लगेच जागृत होणार नाही. बरीच जोडपी प्रसूतीनंतर २ महिन्यांनी शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात करतात. बाळाच्या जन्मानंतर जर पतीला शारीरिक संबंध ठेवावेसे वाटणे हे नॉर्मल आहे, तुमच्याविषयी वाटणारे प्रेम दाखवण्याचा त्यांचा तो मार्ग असू शकतो.

solved 5
wordpress 4 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info