सिझर झाल्यावर?pregnancytips.in

Posted on Thu 21st Apr 2022 : 17:47

सिझेरियन डिलिव्हरीनंतर ताबडतोब व्हायचं असेल फिट, तर आवर्जून खा ‘हे’ ५ पदार्थ!
Pratiksha More | Maharashtra TimesUpdated: 10 Oct 2020, 3:29 pm
118
Subscribe
सिझेरियन डिलिव्हरीनंतर पुन्हा पूर्ववत आयुष्य जगायला फार वेळ लागतो कारण शरीरावरील जखमा खोल असतात. पण चांगला सात्विक व पौष्टिक आहार घेऊन तुम्ही या समस्येतून लवकरात लवकर बाहेर येऊ शकता. जाणून घ्या त्या आहाराविषयी!

which foods women should eat after cesarean delivery in marathi
सिझेरियन डिलिव्हरीनंतर ताबडतोब व्हायचं असेल फिट, तर आवर्जून खा ‘हे’ ५ पदार्थ!

Adv: होम शॉपिंगचा शेवटचा दिवस - घरातील आणि किचनमधील वस्तूंवर मिळवा ७० टक्क्यांपर्यंत सूट

डिलिव्हरीचे दोन प्रकार असतात एक म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी (normal delivery) आणि दुसरी म्हणजे सिझेरियन डिलिव्हरी (cesarean delivery)! यापैकी स्त्रियांना आपली डिलिव्हरी हि नॉर्मल अर्थात नैसर्गिक पद्धतीनेच व्हावी असे वाटत असते, कारण या डिलिव्हरी मध्ये जास्त धोका नसतो आणि डिलिव्हरी झाल्यावर काही दिवसांत स्त्री पुन्हा आपले दैनंदिन आयुष्य जगू शकते. पण या उलट सिझेरियन डिलिव्हरी मात्र त्रासदायक असू शकते. जेव्हा डिलिव्हरीमध्ये काही समस्या उद्भवते तेव्हा ऑपरेशन करून बाळाला बाहेर काढले जाते.

हि डिलिव्हरी कोणत्याही स्त्रीला नको असते कारण डिलिव्हरी नंतरही वेदना सहन कराव्या लागतात आणि रिकव्हर होण्यासाठी काही आठवड्यांचा वा महिन्याचा काळ जाऊ शकतो. सिझेरियन डिलिव्हरी नंतरही स्त्रीची खूप काळजी घ्यावी लागते. तिच्या आहाराविषयी, खाण्याविषयी जास्त सतर्कता बाळगावी लागते. आज आपण या लेखातून जाणून घेऊया की सिझेरियन डिलिव्हरी नंतर स्त्रीने कोणत्या गोष्टी खायला हव्यात. आहार हा शरीराला पोषक तत्वे देण्याचे काम करतो, त्यामुळे या काळात नेमके कोणते पदार्थ खावेत हे माहित असणे गरजेचे आहे.
प्रोटीन

नवीन पेशींच्या निर्माणासाठी आणि जखमा भरण्यासाठी प्रोटीन मदत करते. प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने नुकसानग्रस्त पेशी पूर्ववत होतात आणि सर्जरी नंतर कमकुवत झालेल्या स्नायुंना ताकद मिळते. मासे, अंडी, चिकन, दुग्ध उत्पादने, मांस, वाटाणे, कडधान्ये आणि सुका मेवा यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. या पदार्थांत असलेले सर्वाधिक प्रोटीन अत्यावश्यक अशा अमिनो अॅसिडचा सुद्धा स्त्रोत असतात. आई व बाळ दोघांसाठी हा स्त्रोत गरजेचा आहे.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये किती तास झोप घेणं आवश्यक असतं?)
कॅल्शियम

कॅल्शियम स्नायुंना आराम देते आणि हाडे तसेच दातांना मजबूत बनवते. यामुळे रक्ताची वाढ होण्यास सुद्धा मदत होते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात आणि हाडांचे गंभीर रोग जडू शकतात. म्हणून आपल्या आहारात जास्तीत जास्त कॅल्शियम असेल याची खात्री बाळगावी. दुध, दही, चीज, केळी आणि पालक मध्ये कॅल्शियम असते. स्तनपान करणाऱ्या १४ ते १८ वयातील स्त्रियांना १,३०० ग्रॅम आणि १९ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांनी १००० मिलीग्रॅम कॅल्शियम रोज घ्यायला हवे. यामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची गरज भरून निघते व शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होत नाही.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये सतत भूक लागत असल्यास घाबरू नका, जाणून घ्या 'ही' माहिती!)
लोह

डिलिव्हरी झाल्यानंतर कोणत्याही स्त्रीने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचा स्तर वाढवण्यावर भर द्यावा आणि हा स्तर वाढवायला मदत करते लोह! नवजात बाळाच्या न्‍यूरोलॉजिकल विकासासाठी सुद्धा लोह गरजेचे असते. अंडी, ताजे मांस, अंजीर, कडधान्ये आणि सुका मेवा यांमध्ये खूप लोह असते. १४ ते १८ वयाच्या स्त्रियांना १० मिलीग्रॅम आणि १९ पेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना दरोरोज ९ मिलीग्रॅम लोहाची गरज असते. म्हणूनच डिलिव्हरी नंतर डॉक्टर सुद्धा स्त्रियांना असाच आहार सांगतात ज्यातून स्त्रीच्या शरीराला जास्तीत जास्त लोह मिळेल.

(वाचा :- शिल्पा शेट्टीने डिलिव्हरीनंतर ३ महिन्यांतच मिळवलं लठ्ठपणावर नियंत्रण! काय आहे तिचं वेट लॉस सिक्रेट?)
विटामिन 'सी'

स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या शरीराला १२० मिलीग्राम व्हिटॅमिन 'सी' ची गरज असते. यामुळे आई व बाळ दोघांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. डिलिव्हरी नंतर सर्वाधिक आवश्यक घटकांपैकी एक असणारा घटक आहे व्हिटॅमिन 'सी' कारण व्हिटॅमिन 'सी' कोलाजन तयार करण्यास मदत करते. संत्री, टरबूज, पपई, स्ट्रोबेरी, रताळे, टोमीटो, ब्रोकली यांत मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन 'सी' असते. त्यामुळेच या पदार्थांचा डिलिव्हरी नंतर स्त्रीने आहारात अवश्य समावेश करायला हवा. अनेकदा व्हिटॅमिन 'सी' च्या कमतरतेमुळे आई व बाळ सतत आजारी पडत असतात.

(वाचा :- Bacterial vaginosis in pregnancy : योनीतील ‘या’ इनफेक्शनमुळे प्रेग्नेंसीमध्ये उद्भवू शकतात अनेक समस्या!)
फायबर

फायबरमुळे बद्धकोष्ठता होत नाही आणि सिझेरियन डिलिव्हरी नंतर जर बद्धकोष्ठतेची समस्या सतावू लागली तर तो काळ अत्यंत त्रासदायक ठरू शकतो. म्हणून स्त्रीने आपल्या आहारात आवर्जून फायबरचा समावेश करायला हवा. धान्ये, कच्ची फळे आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी जेवढे तुम्ही फायबर युक्त पदर्थ खाल तेवढे जास्त पाणी सुद्धा आवर्जून प्या. तर हे काही पदार्थ आहे जे सिझेरियन डिलिव्हरी नंतर स्त्रीने आपल्या आहारात आवर्जून सामावून घेतले पाहिजे. हा लेख जास्ती जास्त शेअर करा आणि ज्यांना हि माहिती नाही त्यांच्यापर्यंत हि माहिती नक्की पोहोचवा.

solved 5
wordpress 2 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info