सिझेरियन नंतर काय खावे?pregnancytips.in

Posted on Tue 8th Feb 2022 : 18:12

सिझेरियन प्रसुतीनंतर टाळा या १५ चुका

कशी घ्याल सिझेरियन डिलेव्हरी नंतर स्वत:ची काळजी हे देखील नक्की जाणून घ्या.

Written by Editorial Team | Updated : January 5, 2017 9:05 AM IST

प्रत्येक गरोदर महिलेला वाटत असते की आपली नैसर्गिक प्रसुती व्हावी.सि-सेक्शन म्हणजेच सिझेरियन डिलेव्हरी टाळावी असं प्रत्येकीला वाटते.पण सि-सेक्शन टाळणे अशक्य होते जेव्हा बाळ आणि आईचा जीव वाचविण्याचा धोका समोर असतो.अशावेळी बाळ आणि आईचा जीव वाचविण्याचा सि-सेक्शन हा एकमेव पर्याय असतो. सिझेरियन पद्धतीबाबत हे | 5′ गैरसमज आजच दूर करा !

माझ्याबाबतीत ही असेच घडले जेव्हा प्रसुती दरम्यान प्रसुतीकळा सुरु होण्यापुर्वीच माझी गर्भ जलपिशवी फुटली.त्यामुळे इच्छा नसतानाही मग डॉक्टरांच्या सल्यानुसार माझ्या बाळाच्या सुरक्षेसाठी मी सि-सेक्शन करुन घेण्याचा निर्णय घेतला.ऑपरेशन नंतर माझ्या या अनुभवातून पुढे असे लक्षात आले की, सि-सेक्शन डिलेव्हरी झाल्यावर पुन्हा त्या स्त्रीला पुर्ववत होण्यासाठी बराच वेळ लागतो.

यासाठी या काही महत्वाच्या गोष्टी-
Also Read

हिपनिक जर्क- गाढ झोपेत तुम्हाला अचानक हिसका बसल्यासारखा का वाटतो?
प्रसूतीनंतर येणाऱ्या नैराश्यावर मात करण्यासाठी करा योगसाधना !
मासिकपाळी की गर्भपात - नेमका कशामुळे होतोय रक्तस्त्राव हे कसं ओळखाल ?

More News

१.कैथटर काढल्यानंतर तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढी हालचाल जरुर करा.हवे तर हॉस्पिटल स्टाफची मदत घ्या.पण पुर्णवेळ फक्त बेडवर पडून रहाणे टाळा.

२.डॉक्टरनी परवानगी दिल्यास नैसर्गिक विधींसाठी टॉयलेटचा वापर करा.वेदना होत असल्या किंवा कितीही वेळा जावे लागले तरी हा पर्याय नक्कीच योग्य ठरु शकतो.

३.डिलेव्हरी नंतर दोन दिवस आयव्हीएस वर ठेवण्याची शक्यता असते अश्यावेळी कोणतेही खाद्यपदार्थ दिले जात नाहीत.मात्र त्यानंतर खाण्यासाठी परवानगी मिळताच लगेच मसालेदार किंवा मैद्याचे पदार्थ खावू नका.कारण या काळात अपचनाचा त्रास होण्याची शक्यता असते तो टाळण्यासाठी साधे वरणभात आहारात घ्या. सिझेरियन प्रसुतीनंतर आठवड्याभरापासून महिनाभर काय त्रास होतो हे नक्की जाणुन घ्या.
by Taboola
Sponsored Links
You May Like
This term plan gives `3.19 lac premium back at no extra cost*^Max Life Insurance Calculator
Get an MBA Degree in Data Science Without Quitting Your Job.Data Science Degree | Search Ads

४.वजन उचलने टाळा.तुमच्या बाळाशिवाय कोणतेही वजन उचलु नका.कारण त्याचा परिणाम थेट तुमच्या जखमावर होण्याची शक्यता असते.आंतरिक जखमा पुर्ववत होण्यास वेळ लागतो त्यामुळे हॉस्पिटल मधुन घरी आल्यावरही कमीत कमी २ आठवडे कोणतेही वजन उचलू नका.

५.डिलेव्हरी नंतर लगेच व्यायाम सुरु करु नका.यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.त्यांनी सांगितल्यावरच योग्य व्यायाम करणे सुरु करा.डिलेव्हरी नंतर पुन्हा प्रेगन्सी मधले ढगळ कपडे वापरणे कदाचित तुम्हाला आवडणार नाही मात्र यासाठी लगेच डिझायनर जीन्स वापरणे सुरु करु नका.कारण त्यामुळे तुमच्या पोटावर दाब येवून रक्तस्त्राव होवू शकतो.

बाळाला हातात घेवून घरामध्ये फिरा किंवा स्टॉलरच्या सहाय्याने बागेत फिरा.एवढी शारिरीक मेहनत तुम्ही नक्कीच घेवू शकता.

६.वाढलेले पोट कमी करण्यासाठी मॅर्टीनिटी बेल्टचा वापर करु नका.तुमचे पोट नैसर्गिक रित्या कमी होईल.बेल्टच्या वापरामुळे तुम्हाला हार्नियाचा त्रास होण्याची शक्यता असते.

७.तुमच्या जखमेची योग्य काळजी घ्या.ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी तंतोतंत पाळा.जखम पुर्ण बरी होईपर्यंत गरम पाण्याने अंघोळ करु नका.

८.आरामदायक स्थितीत झोपा.टाके काढून जखम भरु लागल्यावरही पाठीवर झोपणे तुम्हाला कदाचित त्रासदायक वाटु शकते.त्यामुळे कुशीवर झोपावे लागु शकते.

९.बाळाचा पाळणा तुमच्या बेड जवळच ठेवा.त्यामुळे प्रत्येकवेळी बाळाला घेताना किंवा त्याला दुध पाजण्यासाठी घेताना तुमच्या जखमेवर ताण येणार नाही.

१०. बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या.यासाठी मुबलक प्रमाणात पाणी प्या.बद्धकोष्ठतेमुळे पोटावर दाब आल्यास ते त्रायदायक ठरु शकते.

११.केवळ जास्त वेळ बसण्यास त्रास होतो म्हणुन तुमच्या बाळाला ब्रेस्टफिडींग करणे टाळू नका. ब्रेस्टफिडींग तुमच्या बाळासाठी चांगले आहे तसेच ते तुम्हालाही पुर्ववत होण्यास फायदेशीर ठरु शकते.जर तुम्ही बाळाला मुबलक स्तनपान करु शकलात तर तुम्हाला भविष्यात मैस्टाइटिस व एन्गॉर्जमेंट अश्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

१२.सेक्स साठी घाई करु नका.जरी तुमच्या डॉक्टरनी तुम्हाला सहा आठवडे काळजी घेतल्यानंतर सेक्स करण्याचा सल्ला दिला असला तरी तुमच्या शरीराला पुर्ववत होण्यास व सेक्स साठी प्रवृत्त होण्यास वेळ लागु शकतो.याबाबत प्रथम तुमच्या जोडीदाराशी चर्चा करा व सहवासाठी इतर पर्याय निवडा.

१३.जखम पुर्ण बरी होईपर्यंत ताप,डोकेदुखी,मळमळणे अश्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करु नका.कदाचित ही संसर्गाची लक्षणे असु शकतात.

१४.स्वत:च्या मर्जीने पेनकिलर्स घेणे टाळा.ऑपरेशन नंतर डॉक्टर तुम्हाला काही काळासाठी पेनकिलर्स देतात पण तो कोर्स पुर्ण झाल्यावर त्रास झाल्यास स्वत:च पेनकिलर्स घेवू नका. ब्रेस्टफिडींग करण्याच्या काळात अश्या पेनकिलर्स घेणे हानिकारक ठरु शकते.सहा आठवड्यानंतर देखील वेदना होत असतील तर त्वरीत तुमच्या डॉक्टरशी चर्चा करा.

१५.सर्वप्रथम तुमच्या शरीरावरचे व्रण स्विकारा. सि-सेक्शन नंतर तुमच्या शरीरावरचे जखमांचे व्रण कायम तसेच रहातात.मात्र त्यामुळे नाराज होऊ नका.स्वत:वर पुर्वीपेक्षाही जास्त प्रेम करा.लक्षात ठेवा या व्रणामुळे आज तुम्हाला मातृत्वाचे सुख लाभले आहे.

solved 5
wordpress 2 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info