ओव्हुलेशन कसे ओळखावे?pregnancytips.in

Posted on Mon 10th Oct 2022 : 16:48

स्त्री महिन्यातून ज्या दिवसांत सर्वाधिक प्रजननक्षम असते, त्या दिवसांना ovulation days असं म्हणतात. ओव्ह्युलेशनबद्दल अनेक गैरसमज, चुकीची किंवा कपोलकल्पित माहिती पसरलेली असते.

- ओव्ह्युलेशन डे कसा ओळखावा?

- साधारणपणे मासिक पाळीच्या 13 ते 15 दिवस आधी ओव्ह्युलेशन होतं; पण प्रत्येक स्त्रीमध्ये मासिक पाळीचं चक्र वेगवेगळं असतं, त्याप्रमाणे प्रत्येक वेळच्या ओव्ह्युलेशनची वेळही बदलू शकते. मासिक पाळीचं चक्र 28 दिवसांचं असेल, तर 14वा दिवस ओव्ह्युलेशनचा (Ovulation Day) असतो. त्याआधीचे दोन-तीन दिवस हे गर्भधारणेची सर्वांत जास्त शक्यता असलेले असतात.

- ओव्ह्युलेशनची लक्षणं

- ओव्ह्युलेशनची लक्षणं (Symptoms) प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळी असू शकतात. सौम्य दुखी जाणवू शकते, स्पॉटिंग होऊ शकतं, संभोगाची इच्छा वाढू शकते, स्तनांमध्ये नाजूकता येते, व्हजायनामधून बाहेर पडणाऱ्या स्रावाचं प्रमाण वाढू शकतं, त्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये बदल होऊ शकतो. ते निर्मळ आणि एग व्हाइटप्रमाणे बुळबुळीत असू शकतं. याव्यतिरिक्त ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी, बेसल बॉडी टेम्परेचर (शरीराचं तापमान), ओव्ह्युलेशन प्रेडिक्शन किट्स, ओव्ह्युलेशन इंडिकेटर अॅप्लिकेशन्स आदींच्या माध्यमातून किंवा ट्रॅकिंग कॅलेंडर ठेवून ओव्ह्युलेशनचा कालावधी ओळखता येऊ शकतो.

- फर्टाइल विंडो म्हणजे काय आणि ओव्ह्युलेशनशी तिचा कसा संबंध आहे?

- गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वाधिक असलेला प्रजनन चक्रातला कालावधी म्हणजे फर्टाइल विंडो (Fertile Window) होय. शुक्राणू स्त्रीच्या शरीरात तीन दिवसांपर्यंत क्रियाशील राहू शकतो; बीजांडाचं आयुष्य मात्र केवळ 24 तासांचं असतं. त्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न करण्याकरिता सर्वांत योग्य कालावधी म्हणजे ओव्ह्युलेशनपूर्वी तीन-चार दिवसांपासून ओव्ह्युलेशननंतरच्या दोन दिवसांपर्यंतचा असतो.

- वयाच्या चाळिसाव्या वर्षानंतरचं ओव्ह्युलेशन आणि गर्भधारणा

- स्त्रीच्या शरीरातील बीजांडांचा दर्जा आणि संख्या यांमध्ये तिशीनंतर घट होऊ लागते आणि पस्तिशीनंतर तर ती घट वेगाने होते. त्यानंतर मूल हवं असेल तर विविध कृत्रिम पद्धतींद्वारे शक्य आहे. वयाच्या चाळिसाव्या वर्षानंतर ओव्ह्युलेशनचं सातत्य घटत जातं आणि वंध्यत्वाचा धोका वाढत जातो. त्यानंतर एग फ्रीझिंग, क्रायोप्रिझर्व्हेशन, एम्ब्रियो प्रिझर्व्हेशन, पीजीटीए, आयव्हीएफ, आययूआय इत्यादी तंत्रांचा वापर योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली केल्यास चाळिशीतही गर्भधारणा शक्य होऊ शकते.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info