गरोदर आहे हे किती दिवसात कळतं?pregnancytips.in

Posted on Tue 8th Nov 2022 : 10:05

गर्भधारणा झाली कसे ओळखावे व गरोदर असल्याची लक्षणे | pregnancy symptoms in marathi

Pregnancy Symptoms in Marathi : आई बनणे ही स्त्री च्या आयुष्यातील अत्यंत आनंदाची गोष्ट असते.एका महिलेला जसेही गर्भवती असल्याची सूचना मिळते तिच्या त्या आनंदाला सीमा नसते. परंतु गर्भधारणा ही आपल्यासोबत अनेक समस्या आणि शारीरिक बदल घेऊन येते. मासिक पाळी न येणे निश्चितच गरोदर असल्याचे संकेत आहे परंतु याशिवाय देखील गर्भधारणा झाली हे ओळखण्यासाठी अनेक वेगवेगळी गरोदर असल्याची लक्षणे दिसू लागतात.

आजच्या या लेखात आपण गर्भधारणा झाली कसे ओळखावे (symptoms of pregnancy in Marathi) आणि गरोदर पहिला महिना लक्षणे जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया…
pregnancy symptoms in marathi | गर्भधारणा झाली कसे ओळखावेpregnancy symptoms in marathi

Table of Contents
गरोदर पहिला महिना लक्षणे | pregnancy symptoms in marathi

गर्भधारणा झाल्यावर मासिक पाळी थांबणे, रक्तस्त्राव आणि शरीरात जकडण, स्तन दुखणे, थकवा जाणवणे, पुन्हा पुन्हा लघवी लागणे, चिडचिडेपण (मूड स्विंग), छातीत जळजळ इत्यादि लक्षणे जाणवू लागतात. ही सर्व लक्षणे शरीरात जाणवू लागली की गर्भधारणा झाली असे ओळखावे.

याशिवाय इतर काही संकेत आहेत जे गर्भधारणा झाली हे कसे ओळखावे या मध्ये उपयोगी आहेत-

मासिक पाळी थांबणे
ह्याला गरोदरपणाचे सुरुवाती संकेत मानले जाते. जेव्हा एखादी स्त्री गर्भवती होते तेव्हा तिच्या शरीरात प्रोजेस्टोरेन हार्मोन तयार होऊ लागतात. ज्यामुळे मासिक पाळी थांबते.

रक्तस्त्राव आणि शरीरात जकडण
ज्यावेळी गर्भाशयात गर्भ तयार होतो तेव्हा महिलेला हलका रक्तस्राव होऊ शकतो. यासोबतच शरीरात जकडन होते. हे लक्षण गर्भधारणेच्या एक आठवड्यानंतर दिसू लागतात. परंतु जर अधिक ब्लीडींग होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा कारण अधिक रक्तस्त्राव मुळे गर्भपात होऊ शकतो.

स्तन दुखणे
जेव्हा एखादी महिला गर्भवती होते तेव्हा हार्मोनल बदलाव मुळे पहिल्या महिन्यात स्तनात दुखणे सुरू होते. यासोबतच स्तन टाईट होणे, काही महिलांच्या स्तनावर नसा दिसू लागणे आणि काही महिन्यानंतर स्तनांचा आकार बदलणे यासारखे लक्षण दिसू लागतात.

थकवा जाणवणे
जेव्हा स्त्री गर्भवती होते तेव्हा तिला काहीही काम न करता थकवा येणे. शरीरात सुस्ती आणि ऊर्जेची कमी वाटणे. चालण्या फिरण्यात खूप ताकत लावावी लागत आहे असे वाटणे व फक्त झोपून रहावेसे वाटू लागते.

पुन्हा पुन्हा लघवी लागणे
शरीरातील प्रोजेस्टोरेन हार्मोन चा स्तर वाढल्याने गर्भवती स्त्री ला पहिल्या महिन्यात पुन्हा पुन्हा लघवी लागण्याची समस्या होऊ लागते.

चिडचिडेपण (मूड स्विंग)
pregnancy symptoms in marathi मध्ये मूड स्विंग हे गर्भावस्थेतील एक प्रमुख लक्षण आहे. गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात अनेक स्त्रियांचा मूड व व्यवहार बदलणे सुरू होते. पुन्हा पुन्हा राग येणे, लहानसहान गोष्टींवर चिडचिडेपणा करणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.

निप्पल चा रंग बदलणे
यादरम्यान स्तनाच्या निप्पल वरही अनेक बदल दिसू लागतात. हार्मोन मधील बदलामुळे मेलानोसाइट्स प्रभावित होते. यामध्ये त्वचेचा रंग प्रभावित करणाऱ्या मेलेनिन चे उत्पादन होते. यामुळे त्वचेचा रंग डार्क गडद दिसू लागतो. निप्पल चा रंगही आधीपेक्षा गडद होतो.

छातीत जळजळ
गर्भवती स्त्रीच्या छातीत जळजळ होणे ही समस्या निर्माण होते. गर्भावस्थेतील ही सामान्य बाब आहे. म्हणून जास्त घाबरण्याची आवश्यकता नाही. परंतु जर छातीतील जलन अधिकच वाढली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जास्त भूक लागणे
गरोदर स्त्रीची भूक अचानक वाढून जाते. हार्मोन्स मधील बदलामुळे तिला परत परत भूक लागते. याशिवाय त्या स्त्री ची खाण्यापिण्या मध्ये आवड वाढू लागते. जी गोष्ट तिला आधी खायला आवडत नसे तो पदार्थ ती खाऊ लागते.

मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे

अनेक स्त्रियांच्या हा प्रश्न असतो की पाळी नंतर किती दिवसांनी गर्भ राहतो. म्हणून आपणास या प्रश्नाचे उत्तर देखील आम्ही देऊ इच्छितो. खरे पाहता पाळी च्या किती दिवसांनी गर्भ राहतो हे महिलांच्या बिजकोषातून निघणाऱ्या अंड्यांवर अवलंबून असते. बीजकोशातून निघणाऱ्या अंड्यांवरच हे अवलंबून असते की गर्भधारणा होईल की नाही.

जर आपण मासिक पाळीच्या जवळपास 14 दिवसांनंतर संबंध ठेवत असाल तर गर्भ राहण्याची संभावना अधिक होते. असे यामुळे होते कारण मासिक चक्राच्या 14 दिवसांनंतरच अंडे बीजकोषातून निघण्याचे योग्य वेळ असते. बिजकोषातुन निघणारे अंडे 12 ते 14 तासांपर्यंत जिवंत राहू शकते. म्हणून जर आपण या दरम्यान संभोग केला तर शुक्राणू यांना fertilized करून देता आणि गर्भ राहून जातो.
गर्भधारणा झाली कसे ओळखावे व संपूर्ण खात्री

जर वरील लक्षणे आपल्याला दिसत असतील आणि गरोदरपणाची संपूर्ण खात्री आपण करू इच्छित असाल तर आपण घरच्या घरी प्रेग्नेंसी टेस्ट किट च्या मदतीने खात्री करू शकतात.

आजकाल बाजारात अनेक प्रेग्नेंसी टेस्ट किट उपलब्ध आहेत ज्यांच्यामध्ये तिने स्वतः घरच्या घरी गरोदरपणाची तपासणी करता येते. यासाठी सकाळच्या लघवीतील काही थेंब टेस्ट किट मध्ये टाकून तपासणी करता येते. घरच्या घरी टेस्ट कसे करावे जाणून घेण्यासाठी येथे वाचा>> प्रेगा न्यूज प्रेग्नेंसी टेस्ट किट कसे वापरावे
गरोदरपणात वजन किती असावे ? Pregnancy Weight Gain Calculator in marathi

अनेकांना गरोदरपणात वजन किती असावे व गरोदरपणात वजन कमी होणे किंवा वाढणे यासारख्या समस्या निर्माण होतात. गर्भधारणे दरम्यान स्त्री चे वजन वाढणे आवश्यक मानले जाते. या दरम्यान शरीरात अनेक बदल होतात. गरोदर स्त्रीचे काही प्रमाणात वजन वाढणे योग्य आहे परंतु हे वजन अति प्रमाणात वाढणे देखील चुकीचे आहे. तर गरोदरपणात वजन किती असावे हे जाणून घेण्यासाठी पुढील कॅल्कुलेटर चा उपयोग आपण करू शकतात.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info