गरोदरपणात द्राक्षे खाण्याचे फायदे?pregnancytips.in

Posted on Wed 9th Nov 2022 : 07:34

गरोदरपणात द्राक्ष खाल्ल्याने कोणते लाभ होतात?


गोड-आंबट द्राक्ष खाणं कोणाला आवडत नाही?? ब-याच जणांना फळं खूप आवडतात. पण गर्भावस्थेतील महिलांनी द्राक्ष खाणं कितपत योग्य आहे आणि त्यामुळे त्या स्त्रीला कोणते फायदे होतात हे जाणून घ्या या लेखाच्या माध्यमातून!


महिला गर्भवती झाली की तिची सर्वात मोठी जबाबदारी असते स्वत:च्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे, या संतुलित आहारामध्ये त्या सर्व पदार्थांचा समावेश असतो ज्यातून स्त्रीच्या शरीराला पोषक तत्व मिळतात. आणि पुढे ती तत्व बाळापर्यंत पोहोचतात. या संतुलित आहारांमध्ये फळे देखील समाविष्ट असतात. फळे हि आरोग्यासाठी लाभदायक असतात हे आपल्याला माहित आहेच. पण एक असे फळ आहे जे गर्भवती स्त्रीने खावे की खाऊ नये याबद्दल आजही मतमतांतरे आहेत. ते फळ म्हणजे द्राक्ष! बरेच जण म्हणतात की गरोदर स्त्रीने द्राक्ष खाणे चांगले असते, तर काही जण म्हणतात गरोदर स्त्रीने अजिबात द्राक्षे खाऊ नयेत. आज आपण याच मतभेदा पलीकडील सत्य शोधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नक्की काय आहे खरं. गरोदर स्त्रीने द्राक्ष खाल्ल्याने खरंच नुकसान होतो की फायदा! आणि फायदा होत असेल तर काय आहेत गरोदर स्त्रीने द्राक्ष खाण्याचे लाभ! चला जाणून घेऊया!

गरोदरपणात द्राक्षे खावीत का?

याबद्दल डॉक्टर असे सांगतात की गरोदरपणात द्राक्षे खावीत पण एका मर्यादित प्रमाणातच! द्राक्ष खाल्ल्याने त्यातील खनिज पदार्थ, जीवनसत्त्व आणि कित्येक अन्य पोषक तत्व गरोदर स्त्रीच्या शरीराला मिळतात. परंतु ते म्हणतात न कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात खाण्याने नुकसान होतं, तसचं द्राक्षाचं जास्त सेवन केल्याने सुद्धा काही दुष्परिणाम शरीराला भोगावे लागू शकतात. द्राक्षामध्ये फ्रूक्‍टोज नामक साखर असते. जर गरोदर स्त्रीला जेस्‍टेशनल डायबिटीजची समस्या आहे तर तिची हि समस्या अधिक द्राक्ष खाल्याने मोठ्या प्रमाणात वाढू शकते.


द्राक्षातील पोषक तत्व

द्राक्ष हे पोषक तत्वांचे भांडार आहे. द्राक्षामध्ये कॅल्शीयम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, फ्रूक्टोज, मँगनीज, कोबाल्‍ट, रेसपेराट्रोल, पेक्टिन, फोलिक अॅसिड, सिट्रिक अॅसिड, मॅलिक अॅसिड, टार‍टरिक अॅसिड हे घटक तर असतातच पण त्या व्यतिरिक्त जीवनसत्त्व 'क' आणि अन्य महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे देखील उपलब्ध असतात. याच पोषक घटकांच्या खजिन्यामुळे गरोदर स्त्रीने द्राक्ष खाल्ल्यास तिला आणि तिच्या बाळाला फायदाच होतो. पण जसं की आम्ही वर सांगितलं की द्राक्ष खावीत ती मर्यादित प्रमाणात, कारण अतिसेवनाने यातील काही घटक शरीराला हानी सुद्धा पोहचवू शकतात.

गरोदरपणात द्राक्षे खाण्याचे फायदे

द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणत मॅग्नेशियमची मात्रा असते ज्यामुळे गरोदरपणात होणाऱ्या वेदनेपासून आराम मिळतो. द्राक्षात असणारे लोह गरोदरपणात एनीमिया आजार होण्यापासून बचाव करते आणि हिमोग्लोबिनचा स्तर संतुलित राखते. गर्भावस्था मध्ये रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते. अशावेळेस द्राक्षांचे सेवन केल्याने त्यातील अँटीऑक्सीडेंट रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. द्राक्षात पाणी आणि अँटी-इंफ्लामेट्री गुणधर्म असतात हे गरोदरपणात सांध्यात होणाऱ्या वेदना दूर करतात. द्राक्षात मोठ्या प्रमाणात फायबर असते जे गरोदरपणात अतीसाराचा त्रास झाल्यास त्यातून मुक्तता मिळवून देते.

गरोदरपणात द्राक्ष खाल्ल्याने बाळाला होणारे लाभ

जर गर्भावस्थेत गरोदर स्त्रीने द्राक्ष खाल्लीत तर तिच्या शरीराला फायदा होतोच पण बाळाला सुद्धा त्याचा फायदा होतो. द्राक्षात सोडियम संतुलित प्रमाणात असते, जे बाळाच्या तंत्रिका तंत्राच्या विकासात मदत करते. फ्लेवेनॉल आणि जीवनसत्त्व 'अ' ने समृद्ध असलेली द्राक्षे बाळाच्या डोळ्यांच्या विकासात सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतात. यात रेसवेराट्रोल असतं ते आईचं कोलेस्‍ट्रोल योग्य स्थितीत राखून गर्भात असणाऱ्या बाळाचे हृदय स्वस्थ राखते. तर मंडळी हे परिणाम पाहता गरोदर स्त्रीला द्राक्ष जरुर खायला द्यावीत.


गरोदरपणात द्राक्षे कधी खाऊ नये?

गरोदरपणात द्राक्षे खाल्ल्याने जरी गरोदर स्त्रीला फायदे होत असले तरी असे काही प्रसंग आहेत ज्यामध्ये गरोदर स्त्रीने अजिबात द्राक्षे खाऊ नयेत. जर तुम्हाला द्राक्षांची अॅलर्जी असेल आणि तुम्ही गरोदर असाल तर अजिबात द्राक्षे खाऊ नका. जर तुम्हाला जेस्‍टेशनल डायबिटीजचा त्रास असेल तर द्राक्षांपासून लांबच राहावे. पोटात अल्सर असणे किंवा पचन मार्गात कोणताही त्रास वाटत असल्यास सुद्धा द्राक्षांचे सेवन करू नये. गरोदर स्त्रीला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तिला द्राक्षे खायला देऊ नयेत.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info