गर्भधारणा झाली कसे ओळखावे?pregnancytips.in

Posted on Thu 10th Nov 2022 : 11:49

मासिक पाळी चुकण्याआधीच गर्भधारणेची मिळते माहिती, ही लक्षणं देतील 'गुडन्यूज'
Early Signs of Pregnancy: बाळाचं प्लानिंग करताना प्रत्येक स्त्री उत्सुक असते. प्रत्येक प्रेग्नेंसी ही त्या स्त्रीकरता खास असते. बाळाची चाहुल ही सगळ्यात आधी आपल्याला कशी कळेल? याबाबत त्या स्त्रीमध्ये उत्सुकता असता. अशावेळी अगदी मासिक पाळीच्या तारखेअगोदरच तुम्हाला गोड चाहुलीची बातमी मिळू शकते. हे ३ संकेत अतिशय महत्वाचे.
Early Signs of Pregnancy: आजच्या धकाधकीच्या जीवनाचा परिणाम गरोदरपणावर होत आहे. महिलांना गरोदर राहण्यास अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे. यामध्ये ताण-तणाव, कामाचं प्रेशर आणि अनेक वेगवेगळ्या आजारांमुळे जीवनशैलीवर मोठा परिणाम झाला आहे. असं असताना बाळाच्या विचार करणाऱ्या महिलेला गोड बातमीची, बाळाची चाहुल आपल्याला सर्वात आधी कशी कळेल याची उत्सुकता असते. अनेकदा तर महिलांना मासिक पाळीची तारीख उलटून जाण्याची देखील उसंत नसते. मात्र अनेकदा ही गोड बातमी जाणून घेण्यासाठी महिलेची उत्सुकता सर्वाधिक आहे. अगदी एक महिन्याची वाट बघण्याची देखील तयारी नव्हती. अगदी ३ ते ४ दिवसांतच गरोदरपणाची लक्षणे दिसू शकतात.
​वर्जाइनल डिस्चार्ज होणं
ही लक्षणे गर्भधारणेनंतर लगेच दिसून येतात. कारण जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते, त्यानंतर शरीरात हार्मोनल बदल होऊ लागतात. यामुळे योनीची भिंत जाड होते. त्यामुळे योनीच्या पेशींची वाढ वेगाने होऊ लागते. यामुळे थोडासा स्त्राव होऊ शकतो. परंतु स्त्राव सोबत योनिमार्गात दुखणे, जळजळ किंवा वास येत असल्यास डॉक्टरांना दाखवावे. हे संसर्गाचे लक्षण असू शकते.
​सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे ब्लिडींग होणं
जेव्हा फलित अंडी (फर्टिलाइज्‍ड एग) तुमच्या गर्भाशयाच्या अस्तराला चिकटते तेव्हा त्या प्रक्रियेत काही रक्तवाहिन्या फुटतात. ज्यामुळे थोडासा रक्तस्त्राव जाणवू शकतो. यामुळे मासिक पाळी आली का असा गोंधळ होऊ शकतो. कारण पीरियड्समध्ये रक्तस्राव होतो आणि ओटीपोटात किंवा कंबरेत तीव्र वेदना होतात. परंतु या प्रक्रियेत रक्त खूप हलके होते आणि गर्भाशयात थोडे क्रॅम्पिंग जाणवू शकते. हे लक्षण प्रत्येकामध्ये दिसतेच असं नाही.
​ब्रेस्टमध्ये बदल होणे
जेव्हा एखादी स्त्री गर्भधारणा करते तेव्हा स्तनामध्येही अनेक बदल जाणवतात. स्तनामध्ये जडपणा, मुंग्या येणे किंवा स्पर्श केल्यावर वेदना देखील होऊ शकतात. अशावेळी घाबरून न जाता प्राथमिक अंदाज म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
​थकवा जाणवणे
अनेक महिलांना सुरूवातीच्या दिवसांत थकवा जाणवणे किंवा अशक्तपणा जाणवतो. गर्भधारणेनंतर, महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होऊ लागतात, ज्यामुळे थकवा येतो. यामध्ये थोडा वेळ काम केल्यावर आराम करावासा वाटतो आणि महिलांना जास्त वेळ उभे राहणेही कठीण जाते.
​मॉर्निंग सिकनेस
मॉर्निंग सिकनेस हे अतिशय सामान्य लक्षणं आहे. पहिली पाळी चुकण्याच्या काही दिवस आधी हे लक्षण दिसून येते. मॉर्निंग सिकनेस काही स्त्रियांना सकाळी ऐवजी दुपारी किंवा संध्याकाळी येऊ शकतो. यामध्ये उलट्या होणे, मळमळ होणे किंवा भाजीचा वास येणे ही लक्षणे दिसू शकतात.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info