बाळाला बाळसे येण्यासाठी काय करावे?pregnancytips.in

Posted on Sat 5th Jan 2019 : 14:49

बाळाला झोप येण्यासाठी काय करावे ? बाळाला शांत आणि लवकर झोपवण्यासाठी करून पहा | हे | उपाय !


बाळाला झोप येण्यासाठी काय करावे ? बाळाची शांत झोप (Sleeping Baby) हि एक त्याच्या चांगल्या आरोग्याचे आणि त्याचे पोट भरले असल्याचे लक्षण आहे. जन्मल्यापासून बाळांना दिवस आणि रात्र यामध्ये फरक समजून येत नसतो त्यामुळे बाळाला शांत झोपवण्यासाठी त्याप्रमाणे त्याच्या झोपण्याच्या काही सवयी तयार केल्या जाऊ शकतात जेणेकरून तुम्हाला हि अंदाज येईल कि बाळ केव्हा झोपते आणि केव्हा उठते.

बाळाची शांत झोप हि त्याच्या साठी आणि त्याचबरोबर बाळाच्या आईसाठी हि तितकीच गरजेची आहे. कारण आईची झोप हि तिच्या दुधावर परीणाम करत असते , जर बाळ शांत झोपत नसेल (Newborn Not Sleeping) तर साहजिकच आईची हि झोप पूर्ण होत नाही त्यामुळे आपोआपच आईच्या दुधावर आणि आरोग्यावर या सर्व गोष्टींचा परिणाम होतो.

जर बाळाच्या शांत झोपेसाठी आपण योग्य प्रयत्न केले तर या सर्वातून आपल्याला एक निरोगी आणि हसरे बाळ खेळवता येईल कारण भरलेले पोट आणि शांत झोप बाळाला हसरा आणि निरोगी ठेवते. तर चला पाहुयात कसे आपण आपल्या बाळा ला शांत झोपी लावू शकतो !!

संगीत किंवा अंगाई गीत :

बाळाला झोप येण्यासाठी काय करावे

सगळ्यात सोपा आणि सहज जमणारा उपाय!! बाळा ला झोपी लावताना मंद आवाजात रूम मध्ये शांत संगीत लावू शकता जेणेकरून त्याला झोप येईल. संशोधनानुसार बाळ संगीत भाषेला पटकन उत्तर देते. बाळ जर खूप जोरात रडत असेल तर तुम्ही त्याच्याकडे पाहून जर हळू आवाजात एखादे गाणे गुणगुणू लागला तर ते शांत होऊन तुमचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करते.

बाळ आईचा आवाज हि फार पटकन ओळखत असते ,त्यामुळे जर आईने स्वतः अंगाई गीत बाळासाठी म्हणले तरीही बाळ लगेच शांत झोपी जाते . संगीताला किंवा तुम्ही गायलेल्या गाण्याला बाळ कसे प्रतिक्रिया देतेय हे एकदा अभ्यासून तीच गाणी किंवा तेच अंगाई गीत झोपवताना गायचा प्रयत्न करा म्हणजे नक्कीच बाळ लवकर झोपी जाईल .

मंद प्रकाश:

sleeping baby images

जसा कि बाळाला दिवस आणि रात्र कळत नसल्यामुळे त्याच्या रूम मध्ये खूप जास्त प्रकाश ठेवू नये. बाळा ला झोपवताना रूम मध्ये मंद प्रकाश ठेवावा जेणेंकरुण त्याच्या डोळ्याला त्रास ना होता ते शांत पणे झोपू शकेल. डोळ्यांवर खूप जास्त उजेड हा बाळा ला झोपण्यास त्रास देऊ शकता त्यामुळे रूम मध्ये मंद प्रकाश आणि गरम वातावरण बाळाला लवकर झोपण्यास मदत करू शकते.

बाळाभोवती उबदार कपडे गुंडाळणे :

sleeping baby images

बाळाचे तापमान स्थिर ठेवणे खूप गरजेचे असते ,बाळा ला बाहेरच्या वातावरणाची सवय नसते त्यामुळे बाळाच्या रूम मध्ये तापमान स्थिर ठेवावे त्याच बरोबर बाळाला झोपवताना त्याच्या अंगाभोवती कपडे गुंडाळावे जेणेकरून उबदारपणा येऊन बाळ झोपी जाऊ लागेल. बाळाला झोपवतानाचे कपडे मऊ आणि उबदार असावते जेणेकरून बाळाला शांत झोप लागेल.

बाळाला एकसारखे झुलवणे किंवा झोका देणे :

sleeping baby images

हातामध्ये कपड्यात गुंडाळून बाळाला घेऊन एका दिशेने हळूहळू बाळाला झुलवले तर बाळ हळूहळू झोपी जाऊ लागेल. खूप जणांकडे बाळाला पाळण्यात किंवा झोळी मध्ये हि झोपवले जाते , हे उपाय हि बाळाला झोपी लावू शकतात पण जोरजोरात झोका देऊन बाळाला झोपवू नये. हळूहळू आणि एकाच लयीत बाळाला हलवले तर बाळ शांत झोपी जाऊ शकते.

बाळाचे भरलेले पोट :

sleeping baby images

खूप वेळा बाळाचे पोट भरलेले नसले तरी बाळ शांत झोपी जाऊ शकत नाही. बाळाचा आहार आणि त्याची झोप याचा एक तक्ता केला तर त्याच्या झोपेचं आणि भुकेचे योग्य असे व्यवस्थापन करता येऊ शकते. बाळाचे पोट भरले असेल आणि त्याने ढेकर दिला असेल तरीही बाळ क्षणात लगेच झोपी जाऊ शकते. जर बाळ रडत असेल तर बाळा ला अंगावर दूध देऊन पाहावे पण तो पूर्ण झोपेपर्यंत नाही द्यावे ,बाळ झोपण्याच्या अवस्थेत गेले कि पाजणे थांबवावे आणि मग बाळाला झोपवावे.

खूपवेळा बाळाच्या झोपेचा संबंध त्याच्या भुकेशी जास्त असतो त्यामुळे बाळाचे पोट योग्य रीतीने भरले आहे का हे नक्की पाहावे. बाळाच्या आजूबाजूचे वातावरण हि त्याच्या झोपेवर परिणाम करते त्यामुळे त्याची हि काळजी घेतली गेली पाहिजे. बाळाचे चांगले आणि निरोगी आरोग्य हे झोपेवर आहे जर बाळाची झोप पूर्ण आणि शांत होत असेल तर बाळ छान खेळते आणि आहार हि घेते.

solved 5
wordpress 5 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info