स्त्रियांना मासिक पाळी का येते?pregnancytips.in

Posted on Tue 11th Oct 2022 : 10:31

स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. कधी कधी या अगोदरही सुरू होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरूषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरूपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्राव होतो.
मासिक पाळी चक्र व अवस्था

प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या बाराव्या वर्षी सामान्यत: सुरू होते आणि साधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्षे या कालावधीत थांबते. पाळी सुरू असण्याच्या दिवसात आयुर्वेदानुसार विश्रांतीची गरज असल्याने स्त्रीने श्रमाची कामे करू नयेत. मासिक पाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांनी अथवा पुढची पाळी येण्या अगोदर दोन आठवडे स्त्रीचे बीजांड परिपक्व होऊन बीजपुंजापासून वेगळे होते.
मासिक पाळीचे चक्र

मासिक पाळीच्या चक्राच्या पहिल्या दिवशी रक्त वाहण्यास सुरुवात होते, ज्याला पहिला दिवस म्हणतात. हे चक्र पुढील मासिक पाळीच्या जरा आधी थांबते. हे ऋतुस्त्राव चक्र साधारणपणे २५ ते ३६ दिवसांचे असते. फक्त १० ते १५ टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे हे चक्र अचूक २८ दिवसांचे असते. वयात आल्यानंतरच्या लगेचच्या काळात तसेच पाळी थांबण्याचा वेळी हा फरक ठळकपणे दिसून येतो आणि दोन पाळ्यांमधील कालावधी देखील अधिकतम असतो. रक्तस्राव ३ ते ७ दिवस किंवा सरासरी ५ दिवस सुरू राहतो. या दरम्यान सुमारे ०.५ ते २.५ औंस रक्त जाते. एका सॅनिटरी नॅपकिनमध्ये – ज्याला टॅंपन असे ही म्हणतात – त्याच्या प्रकारानुसार १ औंस रक्त शोषले जाऊ शकते. मासिक पाळी मध्ये वाहणारे रक्त नेहमीच्या जखमेतून येणाऱ्या रक्तापेक्षा वेगळे असते व स्त्राव भरपूर असल्याशिवाय त्याची सहजपणे गांठ तयार (क्लॉटिंग) होत नाही. मासिक पाळीच्या आवर्तनाचे नियमन संप्ररेकांमार्फत म्हणजेच हार्मोन्समार्फत केले जाते. ल्युटिनायझिंग आणि फॉलिकल-स्टिम्युलेटिंग प्रकारची ही संप्रेरके पिट्युटरी ग्रंथींमधून स्त्रवतात आणि ह्यांमुळे बीजांड निर्मितीच्या प्रक्रियेस (ओव्ह्यूलेशन)चालना मिळते व बीजांडकोश (ओव्हरीज्) उत्तेजित होऊन इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनची निर्मिती होते. इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशय व स्तनांना उत्तेजना मिळून त्यांना भावी फलनासाठी सज्ज केले जाते.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info