अंगावरून जाणे म्हणजे काय?pregnancytips.in

Posted on Wed 20th Oct 2021 : 10:27

अंगावरून पांढरे जाणे' कधी होते चिंतेची बाब ?

तुम्हांलाही हा त्रास सतावतोय ?


स्त्रीयांमध्ये अंगावरून पांढरे जाणे (श्वेतप्रदर) ही समस्या सर्रास आढळते. या क्रियेदरम्यान गुप्तांगांमधील बॅक्टेरिया किंवा डेड स्क्रिन बाहेर टाकले जातात. मात्र याचा रंग, स्वरूप आणि प्रमाण हे प्रत्येक स्त्री शरीरानुसार वेगवेगळे असते. निरोगी स्त्रियांमध्ये काही प्रमाणात पांढरे पाणी शरीरातून जाणे हे सामान्य आहे. परंतू त्याचे प्रमाण किंवा रंग बदलणे हे काही इंन्फेक्शन तसेच आजारांचे लक्षण ठरू शकते.

ओव्युलेशन (Ovulation)




मासिकपाळी येण्याच्या काही दिवस आधी काही स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरे जाते. गर्भाशयातील काही ग्रंथी तसेच योनीमार्गाच्या बाहेरील बाजूस हार्मोनल्समुळे पांढरा स्त्राव होतो. तर ओव्युलेशनच्या काळात शरीरात प्रोजेस्ट्रेरॉनच्या पातळीत वाढ झाल्यास अंगावरून पांढरे जाते. हे काही अंशी निरोगी स्त्री आरोग्याचे संकेत देतात. असे डॉ. पूजा मेहता ( स्त्रीरोगतज्ञ, पारस हॉस्पिटल - गुरगाव) यांचे मत आहे.




श्वेतप्रदर हे सुखद संभोग करण्यासाठीचे उत्तम नैसर्गिक ल्युबरिकंट आहे. त्यामुळे या भावनेचा ताबा असणार्‍या हार्मोन्समुळे योनीमार्गातून पांढरे पाणी जाते. मात्र कधी कढी प्रमाणापेक्षा अधिक स्त्रावदेखील जाण्याची शक्यता असते.

गरोदरपणा

गरोदरपणामध्ये स्त्री शरीरातून पांढरा स्त्राव जाणे हे अगदी सामान्य आहे. या काळात हार्मोनल बदलांमुळे अंगावरून पांढरे पाणी जाते. मात्र यामुळे युरिनरी ट्रॅक इंन्फेशनची समस्या दूर राहण्यास मदत होते. तसेच प्रसूतीच्या काळात देखील त्रास कमी होण्यास या पांढर्‍या पाण्याची मदत होते. मात्र गर्भारपणात या सोबतीला रक्त जाणे, लालसर डाग दिसणे असे आढळल्यास तुम्हांला वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ताण

आजकालच्या तणावग्रस्त जीवनशैलीचा तुमच्या शरीरावर थेट परिणाम होतो. ताण तणाव हे स्त्री शरीरात हार्मोन्सचे असंतुलन होण्याचे प्रमुख कारण आहे. यामुळे देखील स्त्रीयांमध्ये पांढरे पाणी जाण्याचे प्रमाण वाढते. हे त्रासदायक नसले तरीही ताण-तणावाकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे तुमच्या शरीरावर नकळत परिणाम होतच असतो.

मात्र कधी होतो हा चिंतेचा विषय ?

अतिरिक्त प्रमाणात शरीरातून पांढरे पाणी जाण्यासोबतच खालील लक्षण आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा -

रंग बदलणे : पांढर्‍या किंवा दुधी रंगाऐवजी हा स्त्राव पिवळा किंवा हिरवा आढळल्यास तसेच त्याला दुर्गंधी येत असल्यास हे इंन्फेक्शनचे संकेत देतात. हे व्हायरल, फंगल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकते. तसेच हे लैंगिक आजाराचे लक्षण आहे.

कन्सिस्टनसी बदलणे : श्वेतप्रदराच्या रंगा - स्वरूपात बदल होण्यासोबतच तुम्हांला वेदना होत असल्यास वेळीच डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घ्यावे.

जळजळ होणे, खाज येणे : अतिरिक्त प्रमाणात अंगावरून पांढरे जाण्यासोबतच जळजळ होणे, खाज येणे हे गुप्तांगामध्ये इन्फेक्शन असल्याचे लक्षण आहे.

संभोग करताना त्रास होणे : संभोग करताना पांढरा स्त्राव जाणे हे खरे तर ल्युबरिकंट समजले जाते. मात तरीही वेदना होणे हे काही समस्या किंवा इंफेक्शनचे संकेत देतात. त्यामुळे या समस्येतून बाहेर पडण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

solved 5
wordpress 2 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info