बाळ खाली सरकण्यासाठी काय करावे?pregnancytips.in

Posted on Tue 11th Oct 2022 : 14:56

डिलिव्हरीआधी ठीक यावेळी बाळ योनीच्या दिशेने सरकते
गरोदरपणात बाळ योग्य स्थितीमध्ये असणे गरजचे असते तेव्हाच त्या स्त्रीची डिलिव्हरी योग्य प्रकारे होऊ शकते. जस जसा डिलिव्हरीचा काळ जवळ येतो तस तशी बाळाची स्थिती बदलू लागते आणि बाळ योनी मार्गाच्या दिशेने सरकू लागते. अशावेळी डिलिव्हरी जवळ आली आहे असे समजावे. डॉक्टर ही स्थिती कोणत्या काळात येईल याचाच अनुमान लावून डिलिव्हरी डेट देतात. आपण आपण या लेखातून जाणून घेऊया की नेमक्या कोणत्या वेळी बाळ योनीच्या दिशेला सरकू लागते. हा संकेत जर स्त्रीला कळला तर आपली डिलिव्हरी जवळ आली आहे हे तिलाही कळू शकेल आणि ती अधिक सावध होऊ शकेल. चला तर जाणून घेऊया ही आगळीवेगळी माहिती जी प्रत्येक स्त्रीला माहित असणे गरजेचे आहे.
बाळ कधी खाली सरकते?

बाळ साधारणपणे गरोदरपणाच्या 34 व्या किंवा 36 व्या आठवड्यात खाली सरकते. परंतु काही स्त्रियांमध्ये प्रसूती कळांची लक्षणे खूप आधी दिसू शकतात. खासकरून ज्या स्त्रिया पहिल्यांदा गरोदर असतात त्यांच्यात ही लक्षणे दिसतात. ह्या स्त्रिया आधीच गरोदर राहिलेल्या असतात त्यांच्या गर्भात बाळ खालच्या दिशेला सरकत नाही. जर असे वाटत असेल की बाळ खाली सरकले आहे तर एकदा डॉक्टरांशी अवश्य संपर्क साधावा. बाळाच्या स्थितीबाबत जाणून घ्यावे जेणेकरून प्रसूती दरम्यान कोणतीच समस्या होऊ नये. सामान्यत: गर्भात बाळाची स्थिती सतत बदलत असते. परंतु जन्माच्या काही काळ आधी पहिल्या गरोदरपणात बाळ खालच्या दिशेला सरकते.
बाळ खाली येणार असल्याचे संकेत

बाळ खाली येण्याआधी काही संकेत मिळू लागतात. जसे की स्त्रीला तिचे पोट अधिक जास्त लटकत असल्याचे दिसू लागते. हळूहळू बाळ खालील बाजूस सरकत असल्याने श्वास घेण्यात समस्या निर्माण होते. याशिवाय पोटात वेदना देखील वाढू शकतात. बाळ जस जसे अधिक खाली सरकू लागते तस तसा सर्विक्स वर दाब वाढू लागतो. यामुळे स्त्रीचे म्युकस प्लग सुटू लागते. जो की गुलाबी आणि जेली प्रकारचा स्त्राव असतो. हा म्युकस प्लग गर्भाशयामध्ये कोणत्याही विषाणूला गरोदरपणाच्या दरम्यान गर्भाशय ग्रीवा मध्ये घुसण्यापासून रोखतो.
बाळ सरकल्याची लक्षणे

बाळ अधिकाधिक सरकू लागल्यावर व अपूर्ण सरकल्यावर काही लक्षणे दिसू लागतात. त्यापैकी महत्त्वाचे लक्षण म्हणजे वारंवार लघुशंका होते. प्रसूतीच्या वेळेस जेव्हा बाळाचे डोके हळूहळू योनीच्या दिशेने सरकू लागते स्त्रीला वारंवार लघुशंका होते. याशिवाय पाठीचे स्नायू सुद्धा मोठ्या वेदनेसह दुखू लागतात. बाळ खाली सरकताच पोटावरचा दबाव आणि छातीची जळजळ कमी होऊ लागते. याशिवाय अजून जास्त समस्या आणि वेदना होऊ लागल्यास डॉक्टरांशी त्वरीत संपर्क साधावा.

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info