पुरुषांनी शुक्राणू वाढवण्यासाठी करा या पदार्थांचा सेवन?pregnancytips.in

Posted on Fri 28th Oct 2022 : 08:25

Sperm Count : शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी पुरुषांनी 'या' पदार्थांचे सेवन करावे

हे चार पदार्थ शुक्राणूंची संख्या वाढवतील, जाणून घ्या

Sperm Count : शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी पुरुषांनी 'या' पदार्थांचे सेवन करावे

मुंबई : पुरुषांमध्ये शुक्राणुंची (Increase Sperm Count) संख्या जास्त असणे खुप गरजेचे आहे. कारण याच गोष्टी त्यांना बाप बनवत असतात व संतान प्राप्ती देत असतात. त्यामुळे स्त्रीला गरोदर राहण्यासाठी शुक्राणूंची संख्या जास्त असणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय शुक्राणूंची गुणवत्ता आणि गतिशीलता देखील चांगली असणे आवश्यक आहे. जेव्हा पुरुष शुक्राणूंची योग्य संख्या तयार करू शकत नाही. तेव्हा ते वंध्यत्वाचा बळी ठरू शकतो. जर तुम्हीही बऱ्याच काळापासून वडील बनण्याचा प्रयत्न करत असाल, परंतु शुक्राणूंची संख्या कमी असेल तर तुम्ही काही पदार्थांना तुमच्या आहाराचा समावेश केले पाहिजे. हे पदार्थ कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.

अंडी
शुक्राणूंची संख्या (Increase Sperm Count) वाढवण्यासाठी अंडी खूप प्रभावी ठरू शकतात. अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही रोज अंड्याचे सेवन केले तर शुक्राणूंची संख्या वाढते. याव्यतिरिक्त, शुक्राणूंची गुणवत्ता देखील गतिशीलता सुधारू शकते. अंडी पुरुषांची प्रजनन क्षमता मजबूत करू शकतात.

अक्रोड
अक्रोड खाऊनही तुम्ही शुक्राणूंची संख्या (Increase Sperm Count) वाढवू शकता. अक्रोडमध्ये प्रथिने, ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् आणि निरोगी चरबी यासह अनेक पोषक घटक असतात. शुक्राणूंची निर्मिती वाढवण्यासाठी निरोगी चरबीची गरज असते. यासोबतच ओमेगा ३ फॅटी अॅसिड अंडकोषांमध्ये रक्त प्रवाह वाढवते, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे शुक्राणूंची संख्या, प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही अक्रोडाचे सेवन करू शकता.

भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बिया पुरुषांसाठीही फायदेशीर ठरू शकतात. भोपळ्याच्या बियांमध्ये फायटोस्टेरॉल असतात, जे पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे उत्पादन सुधारू शकतात. स्नॅक्समध्ये भोपळ्याच्या बियांचा समावेश करून शुक्राणूंची संख्या वाढवता येते. भोपळ्याच्या बिया रोज खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या आणि प्रजनन क्षमता वाढते. हे शुक्राणूंची गुणवत्ता देखील सुधारू शकते.

केळी
केळी हे सुपरफूड म्हणून ओळखले जाते. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 1 आणि सी असते. हे सर्व पोषक पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करतात. केळी नियमित खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या वाढू शकते. हे शुक्राणूंची गुणवत्ता देखील सुधारू शकते.

चरबीयुक्त मासे
चरबीयुक्त मासे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवू शकतात. फॅटी फिशमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् अंडकोषांमध्ये रक्त प्रवाह वाढवतात. यामुळे शुक्राणूंची संख्या वाढते आणि गुणवत्ता देखील सुधारू शकते. शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही सॅल्मन, सार्डिनसारखे फॅटी मासे खाऊ शकता.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)

solved 5
wordpress 1 year ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info